पुणे/हडपसर – उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये शनिवारी हडपसर विधानसभा मतदार संघातील 10 अर्ज बाद झाले आहेत. आता 19 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. हडपसर मतदार संघातून 29 अर्ज दाखल झाले होते. शनिवारी सकाळी या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात काही उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज भरले होते, हे अर्ज बाद झाले आहेत.
यशिवाय दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज काही तांत्रिक अडचणींमुळे बाद झाले आहेत. दरम्यान, सोमवारी येथून कोण माघार घेतो आणि कोण कोणाला पाठिंबा देतो, यावर मतदानाची पुढील गणिते ठरणार असून काही बंडोबांना थंड करण्यासाठी पक्ष पातळीवर काय निर्णय घेतले जातात, याकडेदेखील मतदारांचे लक्ष लागले आहे.