पुणे – भाजप-शिवसेना महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या जागा रिपाइंला सोडण्यात आल्याची अधिकृत घोषणा बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
मात्र, माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. तर, या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र, त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी.
तसे होणार नसेल, तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मात्र, भाजपकडून पुणे कॅन्टोन्मेंटसाठी विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.