सातारा: भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे.
त्यात कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले जयकुमार गोरे यांना माणमधू व मदन भोसले यांना वाईमधून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली आहे. यापैकी माण व वाई हे दोन मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याचे होते. अजून कराड उत्तर, कोरेगाव, पाटण आणि फलटण येथील युतीचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत.