सुपरहिट ‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका निभावणारा राणा दग्गुबती सध्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे फारच चर्चेत आहेत. राणा दग्गुबतीने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राणा दग्गुबातीवर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्याची वृत्त पसरले होते. परंतु, नंतर त्याने या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र इंस्टाग्रामवरील या फोटोमध्ये राणा दग्गुबाती खूपच अशक्त आणि हडकुळे दिसत आहेत. हा फोटो पाहून त्याचे चाहतेही काळजीत पडले असून सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राणा दग्गुबतीने, माझ्या तब्येतीला काहीही झाले नाही. ही बातमी पूर्णपणे निराधार आहे. मी यावर स्पष्टीकरण देऊन थकलो आहे. मी तंदुरुस्त आहे. मला असे वाटते की माझ्या खराब आरोग्याचा विषय खूप कंटाळवाणा आहे. पण मला आनंद आहे की लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना माझी काळजी आहे, असे म्हंटले होते.