मुंबई – “महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आणि मुंबईमधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. हे योग्य नाही. शरद पवार आज दुपारी दोन वाजता निश्चितपणे ईडी कार्यालयात जातील. भाजप सरकार अंमलबजावणी संचालनालयाचा दुरुपयोग करत आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला आहे.
NCP leader Nawab Malik in Mumbai: Police is detaining NCP workers in Mumbai and in other parts of the state, it is not right. Sharad Pawar will definitely go to ED office at 2 pm today. BJP government is misusing Enforcement Directorate. pic.twitter.com/hN9RJtA8ok
— ANI (@ANI) September 27, 2019
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अंमलबजावनी संचालनालयाचया (ईडी) मुंबईतल्या कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. आज दुपारी 2 च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहचणार आहेत. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.