पुणे: स्वयंसेवी संस्था आणि बचत गट त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी पुण्यात बाजारपेठ उभी राहणार आहे. यासोबत त्यांच्याकडून केलेल्या कामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
ह्या प्रदर्शनादरम्यान शेतकऱ्यांना ,कारागिरांना ,स्वयंम सहायता गटांना त्यांच्या कामकाजाला लागणारी आवश्यक बाजारपेठ उभारण्यास मदत होईल. गेल्या 11 वर्षेपासून नाबार्ड यास समर्थन करत आहे. या प्रदर्शनामध्ये यावर्षी नाबार्डचे विविध गटांचे 10 स्टॉल असतील, जिथ ते ग्रामीण भागातील प्रॉडक्ट्स ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.
हे प्रदर्शन क्रिएटीसिटी ( पुर्वीचा इशान्य मॉल ) गोल्फ कोर्स सामोर, एयरपोर्ट रोड, येरवडा, पुणे याठिकाणी असणार आहे.