#व्हिडिओ: बोलघेवड्यांनो, सर्वोच्च न्यायलयावर विश्वास ठेवा : मोदी

नाशिक : गेल्या दोन तीन आठवड्यात काही बोलघेवडे राममंदिराविषयी वक्तव्य करत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायलयावर विश्वास ठेवला पाहिजे, अशा शब्दात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव घेता शरसंधान केले. शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख करत ते देशाच्याविरोधी वक्तव्य करत असल्याबद्दल पंतप्रदानांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

नाशिक येथील महाजनादेश यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
पंतप्रदानांच्या भाषणाचा रोख मुख्यत:काश्मिर आणि ३७० कलमहटवण्याच्या कृतीचे समर्थन करण्यावर होता. ते म्हणाले, काश्मिर वासीयांना प्रगतीच्या रस्त्यावर यायचे आहे. त्यांना हिंसेचा रक्तलांछीत मार्ग सोडायचा आहे. सर्व देशाने आता काश्मिरच्या विकासाचा मार्ग संकल्प करायचा आहे.

विरोधी पक्ष म्हणून सरकारवर, आमच्यावर टीका करणे हे त्यांचे कामच आहे. मात्र ही टीका देशाच्या हिताच्या विरूध्द असू नये. अन्य नेते बोलतात त्याचे काही वाटत नाही मात्र, शरद पवार यांच्यासारखे बुजुर्ग नेते अशी विधाने करतात तेव्हा त्याचेआश्‍चर्य वाटते, अशा शब्दात मोदी यांनी टीका केली.

पंंतप्रधान म्हणाले, नाशिकला आम्हाला संरक्षणाचे महत्वाचे केंद्र बनवायचे आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण अशा सागर किनार्‍याच्या विकासासाठी अदीच लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील मोठा भाग महाराष्ट्राला मिळणार आहे. तेथील बंदरे अधिक मजबूत करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण लकरण्यावर सरकारचा भर आहे.

फडणवीस सरकार हे विकासासाठी कटीबध्द असणारे सरकार आहे. जलयुक्त शिवारचे कामप्रशंसनीय आहे. १७ हजार गावे यातून जलसंकटमुक्त झाली आहेत. या कामाला येत्या पाच वर्षात गती द्यायची आहे. या सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. पर्यटनाला चालना दिली आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)