काळखैरेवाडीत महिला बनताहेत स्वावलंबी

काऱ्हाटी- काळखैरेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायत व ओम साई कॉम्प्युटर्स सुपे यांच्यावतीने ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण व गिरणी वाटप करण्यात आले. वाढत्या बेरोजगारीमुळे महिलांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभारावे व स्वावलंबी बनून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा यासाठी परिसरातील महिला व मुलींसाठी हे मोफत प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये परिसरातील 137 महिलांनी सहभाग घेत प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी ग्रामपंचायत काळखैरेवाडी 15 टक्‍के निधीमधून मागासवर्गातील कुटुंबांना 19 गिरणीचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लहान-मोठी लघुउद्योग वाढत चालले आहेत. त्यामुळे या सर्व उद्योगातून ग्रामपंचायत करातही मोठी भर पडली आहे.

शासनाचा कोणताही अनुदान लाभ न घेता ग्रामपंचायतीच्या शिल्लक रकमेतून शेतकरी सुधार योजना पाच लाख, शेततळी 55 हजारे, विद्यार्थी योजना 25 हजार, महिला व जन्मजात मुलींसाठी प्रत्येकी 11 हजार, खेळासाठी 10 हजार, सरपंच गृह सुधार योजनेसाठी 2 लाख रुपये अशा योजना राबवण्याचा मानस सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांनी घेतला आसल्याचे सरपंच विशाल भोंडवे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच अतुल खैरे, ग्रामसेवक नीला ढोले, सदस्य मीना भोंडवे, ताई चांदगुडे, कृषी सहाय्यक अमोल लोणकर, संजय जगताप, सुरेश चांदगुडे, रमाकांत काळखैरे, अजित काळखैरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रामाचे सूत्रसंचालन नितीन नगरे तर संजय भोंडवे यांनी आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×