बॉलीवूडमध्ये सध्या कोणत्या न कोणत्या स्टार किडची चर्चा होतच असते. कोणाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो, तर कोण बॉलीवुडमध्ये डेब्यू करणार असतो. अशाच काही कारणामुळे दिग्गज अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहूजा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. टीनाने नुकतेच म्यूझिक व्हिडिओमध्ये डेब्यू केले आहे. हे गाणे तिने गायक गजेंद्र वर्मासोबत साकारले आहे. या गाण्याला खूपच प्रसिद्धी मिळत असून टीनाची खूपच स्तुती होत आहे. सोशल मीडियावरही तिला लाखो लाईक्स मिळत आहेत.
टीनाने गजेंद्रसोबत “मिलो ना तुम’ या गाण्यातून डेब्यू केले आहे. हे गाणे 1970मध्ये प्रदर्शित झालेल्या “हीर रांझा’ चित्रपटातील “मिलो ना तुम तो हम घबराए’ या गाण्याचे रीमिक्स व्हर्जन आहे. या गाण्यात टीना खूपच सुंदर अशी दिसते. या गाण्याला यू-ट्यूबवा आतापर्यत लाखो व्यूज मिळाले आहेत.
टीना सोशल मीडियावरही खूपच ऍक्टिव असते. ती सतत आपले फोटो शेअर करत राहते. टीनाने आपल्या नवीन म्यूझिक व्हिडिओ प्रमोशनसाठी टिक-टॉकवरही डेब्यू केले होते. टीनाची वाढती लोकप्रियता पाहता तिचे नाव लवकरच स्टार अभिनेत्रींच्या यादीत येउ शकते.