चिन्मयानंदच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह एसआयटीकडे

बेडरूमपण केली सील

शहजहानपूर: भाजप नेते चिन्मयानंदांवर बलात्काराच आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ चिन्मयानंदांचे 43 व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह विशेष तपास पथकाकडे सोपवला आहे. या पीडीत युवतीकडे “एसआयटी’ने पुराव्यांची मागणी केली होती. त्यानुसार तिने हा पुरावा दिला आहे. “एसआयटी’ने या युवतीची शुक्रवारी चौकशी केली होती अणि चिन्मयानंदाच्या बेडरूममधून काही पुरावे गोळा केले होते, असे सूत्रांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यत अई आहे. “एसआयटी’ने या युवतीला शुक्रवारी चिन्मयानंदच्या घरी नेले आणि सुमारे 5 तास घराची तपासणी केली. तर शनिवारी या युवतीच्या आईला “एसआयटी’ने बोलावून घेतले आणि त्यंची चौक्षी केली. गुरुवारी चिन्मयानंद यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. त्याच रात्री दिव्य धाम येथील त्यांच्या घरातल्या बेडरूमला सील ठोकण्यात आले होते.

बेडरूममधील महत्वाचे पुरावे हटवण्यात आले असल्याचा आरोप पीडीत युवतीने केला होता. म्हणून यावेळी फॉरेन्सिक तज्ञांचे एक पथकही उपस्थित होते. तिने एलएलएममध्ये प्रवेश घेतल्यानंतर चिन्मयानंदच्या माणसांनी तिला तिच्या घरी बोलावले आणि तिला वरच्या मजल्यावरील एका खोलीत सोडले, जिथे चिन्मयानंद यांनी तिला आंघोळ करतानाचा व्हिडिओ दाखविला, त्यानंतर तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ बेडरूममध्ये तपास संस्थेला सापडला नाही. चिन्मयानंदच्या हरिद्वार आश्रमात ठेवला असावा असा दावा या युवतीने केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)