विकी कौशलचा लीड रोल असलेल्या “भूत पार्ट वन, द हंटेड शीप’चे पोस्टर रिलीज झाले आहे आणि सिनेमाच्या नावाप्रमाणेच हे पोस्टर देखील भयानक आहे. बुडालेल्या जहाजावरील भूताने विकी कौशलला घट्ट पकडलेले आहे, असे या पोस्टरमध्ये दिसते आहे. विकीने हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
“भीतीपासून सुटका करून घेऊ शकत नाही. मला झपाटलेल्या जहाजापासून सुटका करून घ्यायला मदत करा.’ असे त्याने या पोस्टमधील कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “भूत….’ 15 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे. विकी कौशलने नुकतेच या सिनेमाचे शुटिंग संपवले आहे.
या सिनेमाच्या यापूर्वी रिलीज् झालेल्या पहिल्या पोस्टरमध्ये विकी कौशल बुडणाऱ्या जहाजाच्या फुटलेल्या खिडकीतून बाहेर डोकावतो आहे आणि एक लांब नखे वाढलेल्या हाताने त्याचे तोंड दाबून धरले आहे, असे दिसते आहे. त्या पोस्टला विकीने “या भीतीमध्ये बुडून जा.’ अशी भन्नाट कॅप्शन दिली होती. एकूणच या सिनेमामध्ये बुडणाऱ्या जहाजावरील भूतांच्या तावडीत सापडलेल्या भूतांची भयकथा विकीबरोबर आपल्यालाही घाबरवणार आहे.
“भूत पार्ट वन, द हॉंटेड शीप’मध्ये विकी बरोबर भूमी पेडणेकरही असणार आहे. याशिवाय विकी कौशल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये आणि करण जोहरच्या “तख्त’मध्येही काम करतो आहे.