माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या पुस्तकात दावा
नवी दिल्ली : अयोध्यतेतील वादग्रस्त राममंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होत आहे. दरम्यान, या सुनावणीतून काही तरी तोडगा समोर निघेल अशी आशा प्रत्येक जण करत आहे. त्यातच आता या मंदीरासंबंधीचा नवीन दावा पुढे आला आहे. अयोध्येतील राम मंदीर हे बाबरने नाही तर औरंबजेबाने पाडल्याचा दावा माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी केला आहे. त्यांनी हा दावा त्यांच्या अयोध्या रिव्हिजीटेड या पुस्तकातून केला आहे. दरम्यान, आता त्यांचे हे पुस्तक सर्वोच्च न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार की नाही हे पाहणे गरजेचे आहे.
किशोर कुणाल हे 1972 च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. बाबरी मशिदच्या जागेवर अगोदर प्रभू रामचंद्रांचे मंदीर होते. याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, हा किशोर कुणाल यांचा दावा आहे त्यांच्या या दाव्यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत. पुस्तकात प्राचीन संस्कृत ग्रंथातील उतारे, पुरातत्व खात्याने याठिकाणी केलेल्या उत्खननाचा अहवाल यांचा समावेश आहे. दरम्यान, या पुस्तकाच्या प्रस्तावणेत माजी सरन्यायाधिश जी.बी. पटनायक यांनी,या पुस्तकाच्या माध्यमातून या वादग्रस्त प्रकरणाचे नवे पैलु समोर आले आहेत, एवढेच नाही तर यासाठी सबळ पुरावेदेखील देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.