सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रंगत आहेत. सुशांत सिंग राजपूत या नात्याला एक पाऊल पुढे न्यायचे होते. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र या प्रकारणावर सुशांतने अखेर मौन तोडले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, या संदर्भातला प्रश्न जेव्हा सुशांतला विचारण्यात आला यावर तो हसून म्हणाला, ही निव्वळ अफवा आहे. सध्या मी याप्रकारच्या न्यूज वाचणे आणि पहाणे बंद केले आहे. एका रिपोर्टनुसार सुशांतला त्याची प्लेबॉयची इमेज बदलण्यासाठी रियासोबत लग्न करायचे आहे. सुशांत लग्नासाठी एका पायावर तयार असला तरी रिया मात्र या लग्नासाठी तयार नाही. मात्र सुशांतने याला अफवा असल्याचे सांगितले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत सुशांतने रिया व त्याच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्यास नकार दिला होता. “मी याबद्दल काहीही सांगणार नाही. मला याबद्दल बोलण्यास मनाई करण्यात आली आहे, असे नाही. पण मी स्वत:च स्वत:ला याबद्दल बोलण्याची परवानगी दिलेली नाही. माझ्या मते, खुलासा करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही,’ असे तो म्हणाला होता.