नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज (दि. 25) इतिहास रचला. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे पराभूत केले. सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावलं आहे.
दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी’ यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे.
Congratulations to PV Sindhu on her historic win at the #BWFWorldChampionships pic.twitter.com/q7T1tAXWIh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 25, 2019