ताशी 174 किमी वेगाने चालवली सायकल

लंडन: सायकल वेगाने चालवता येऊ शकते. पण ती कारला हरवू शकत नाही, हा तुमचा आमचा समज आहे. पण आता तो जमाना गेला. ताशी 174 किलोमीटर वेगाने सायकल चालवून इंग्लंडमधील नील कॅम्पबेल या सायकलपटूने नवा विश्‍वविक्रम केला आहे.

इंग्लंडमधील नॉर्थ यार्कशायरच्या एका विमानाच्या धावपट्टीवर वेगाने सायकल चालवण्याचा हा विक्रम करण्यात आला. हा विक्रम केल्यानंतर सायकलपटू नील कॅम्पबेलने आनंद व्यक्त केला आहे. ही सगळी माझ्यासोबतच्या टीमची कमाल आहे. मी खूप आनंदी झालो. एवढे कधी करेन, असे वाटले नव्हते. वातावरणाचाही मला फायदा झाला. जेव्हा चाचणी घेतली तेव्हा फायदा झाला. नील कॅम्पबेल या सायकलपटूने त्याची सायकल एका कारच्या मागे बांधली. त्यानंतर कार वेगाने पळवण्यात आली. ताशी 174 किलोमीटरचा वेग गाठल्यानंतर कार आणि सायकल वेगळ्या झाल्या. विशिष्ट वेग गाठल्यानंतर नीलने ज्या कारची सुरुवातीला वेग गाठण्यासाठी मदत घेतली होती. तिलाही मागे टाकले.

28 वर्षापूर्वी म्हणजेच 1995 मध्ये एका सायकलपटूने 168 किलोमीटर वेगाने सायकल चालवण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम नीलने मोडीत काढला. आपल्या या नव्या विक्रमामुळे नागरिक जास्तीत जास्त सायकल वापरायला प्रवृत्त तर होतीलच; शिवाय त्यामुळे भूगर्भातील इंधनावर वाहने चालवण्याची अपरिहार्यताही कमी होईल. याचाच दुसरा अर्थ, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदुषण टाळण्यासाठी आणि फॉसिल फ्युएल (पेट्रोल-डिझेल-सीएनजी) वाचवण्यासाठी सायकल चालवणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नीलने सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)