पोलिसांकडून नियमावली : अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाई
पुणे -गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात ढोल-ताशा पथकांचा दणदणाट पोलिसांनी आवळला आहे. त्यासाठी गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथक प्रमुखांना विविध नियमांसह अटींचे पालन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार अटींचे ढोल-ताशा पथकांकडून उल्लंघन झाल्यास कारवाई होणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून ढोल-ताशा पथकांचे वादन केले जाते. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमानुसार ढोल-ताशा पथकांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
डीजे, डॉल्बीला बंदी
गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मंडळाकडून म्युझिक सिस्टिमसाठी पोलीस ठाण्यांकडून स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हे आहेत पथकांसाठीचे नियम
– प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणेश मंडळांसोबत 3 आणि इतर मंडळांसोबत
– 2 ढोल-ताशा पथकांचा समावेश असावा.
– एका ढोल पथकामध्ये 40 ढोल, 10 ताशे, 6 झांजा वाद्यांचा समावेश असावा.
– एका ढोल पथकात वादक आणि सभोवतालचे सुरक्षा रक्षकांचे कडे मिळून जास्तीत जास्त 100 सदस्यांचा समावेश असावा. तसेच ढोल वाद्य वापरू नये.
– मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथके एकच असावीत.
– विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाला एकाच गणेश मंडळासोबत सहभागी होता येणार आहे.
– प्रत्येक ढोल-ताशा पथकास विसर्जन मार्गावर 20 मिनिटापेक्षा जास्त वादन करता येणार नाही.