पुणे -न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जास्तीतजास्त मंडळांनी गणेशोत्सव मांडव, तसेच इतर परवान्यांसाठी दोन दिवसांची मुदत उरली आहे. मंळवारी ( दि.20) रोजी ऑनलाइन तसेच ऑफलाइन करण्याचा शेवटचा दिवस आहे आतापर्यंत शहरातील 1,800 मंडळांनी परवान्यांसाठी अर्ज केले आहेत.
गणेशोत्सवात मांडवामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मंडळांना परवाने देण्यासाठी न्यायालयाकडून मार्गदशक सूचना घालून देण्यात आल्या आहेत. याची तपासणीही स्वतंत्र पथकाद्वारे होणार आहे. गणेश मंडळांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनात झालेल्या बैठकीत आधी 5 जुलैपासून ऑनलाइन यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार होती. मात्र, संगणक प्रणाली तयार करण्यास उशीर झाल्याने 15 जुलैपासून ही प्रणाली सुरू होणार होती. मात्र, त्यासही विलंब झाल्याने 20 जुलैपासून हे परवाने देण्यास सुरूवात झाली, तर त्यासाठी 15 ऑगस्ट अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक मंडळांनी परवाने न घेतल्याने कारवाईची वेळ प्रशासनावर आली असती.