नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संसदेच्या अधिवेशनानंतर जम्मू काश्मीरच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. अमित शहा इथल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटीतील सर्व जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमातही शहा सहभागी होणार आहे.
अमित शहा काश्मीरच्या तीन दिवसाच्या काश्मीर दौऱ्यानंतर याच महिन्यात जम्मूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इथेदेखील ते आगामी निवडणुकांची तयारीची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी पक्षाचे सभासदत्वाचे अभियान सुरू करण्यासाठी आणि पक्षासोबत जास्तीत जास्त लोकांना जोडण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार आहेत. संसदेच्या अधिवेशनाची तारीख 7 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तीन तलाक बंदी विधेयकासह अन्य विधेयकावर चर्चा आणि मंजूरीसाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेण्यात आला आहे.