पांढरा झेंडा घेऊन हे मृतदेह घेऊन जा

भारतीय लष्कराचा पाकच्या सेनेला प्रस्ताव

नवी दिल्ली : भारतीय जवानांकडून नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दरम्यान, मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तान एलओसी पडून आहेत. भारतीय लष्कराकडून हे मृतदेह पाकिस्तान सेनेला घेऊन जाण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानी लष्कराने पांढरा झेंडा घेऊन हे मृतदेह घेऊन जावेत, असे भारताने सांगितले आहे. मात्र अद्याप पाकिस्तानकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया किंवा उत्तर आले नाही.

भारतीय लष्कराने जम्मू काश्‍मीरच्या केरन सेक्‍टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या डावपेचाला उत्तर देत पाकिस्तानचे 5 ते 7 जवान आणि दहशतवादी मारले. सीमा भागातून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांना भारतीय लष्कराने उधळून लावलं. भारतीय लष्कराच्या कारवाईत जे दहशतवादी मारले गेले त्यांचे मृतदेह सीमेवर पडून आहेत. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे असतील तर पाकिस्तानी लष्कर हे मृतदेह घेऊन जाऊ शकते. मात्र त्यासाठी त्यांना पांढरा झेंडा घेऊन यावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.