अर्जुन रेड्डीया तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या कबीर सिंगच्या यशानंतर टॉलीवूड स्टार विजय देवराकोंडाची फॅन फॉलोविंग सगळीकडे वाढली असल्याचे दिसते आहे. त्यातच त्याच्या डिअर कॉम्ब्रेडया चित्रपटाचाही रिमेक आता येतो आहे.
या चित्रपटाचे हक्क बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करन जोहरने विकत घेतले आहेत. अर्जुन रेड्डी आणि डिअर कॉम्ब्रेडच्या यशामुळे विजयची फॅन फॉलोविंग कॅश करण्यासाठी करणने त्यालाच “डिअर कॉम्रेड’च्या हिंदी रिमेकमध्ये घेण्याचा विचार केला. यासाठी तो विजयला 40 कोटी रुपये मानधन देण्यासही तयार होता. मात्र, विजयने करणची ही ऑफर नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत बोलताना विजयने सांगितले की, एकच भूमिका दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये साकारण्याची माजी इच्छा नाही. “मला हिंदी चित्रपटांमधील हिरो व्हायची इच्छा नाही. मला उत्तम अभिनेता व्हायचे आहे. एकच गोष्ट दोनदा सांगण्यात कोणताही अर्थ नाही असे माझे मत आहे.
मी माझ्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतो आणि तीच गोष्ट पुन्हा रिमेकसाठी करण्याची इच्छा नाही. प्रत्येक सीन मला आधीच माहीत असल्याने त्यातील उत्साह निघून जातो. त्यामुळे तेच ते करण्यात माझे सहा महिने मी वाया नाही घालवू शकत. त्यामुळे आता विजयने नकार दिल्याने “डिअर कॉम्रेड’च्या हिंदी रिमेकसाठी कोण भूमिका साकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.