कराड – कराड तालुक्यातील सैदापूरला जोडणारा कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा पूल कोसळला. पुलाच्या मध्यभागी असणारे दोन पिलर अचानकपणे कोसळल्याने मधला भाग पूर्णपणे ढासळला.
दरम्यान, गेली पंधरा दिवसांपासून या पुलावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोसळलेला पूल पाहण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी चांगलीच गर्दी केली असून यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. परिणामी वाहतूक कोंडी झाली आहे.