पुणे – माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. लाखो वारकऱ्यांचा मेळा आता दिवे घाटात दाखल झाला आहे.
दरम्यान, पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठय़ा संख्येने पुणेकर देखील सहभागी झाले आहेत. यामध्ये युवक-युवतींचीही मोठी संख्या असून, या सोहळ्यात माउलींच्या वेशात एक चिमुकली देखील सहभागी झाली आहे.