#CWC19 : मॉरिस आणि प्रिटोरसच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव गडगडला

आफ्रिकेसमोर विजयसाठी 204 धावांचे लक्ष्य

चेस्टरलेस्ट्रीट – ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रिटोरसच्या भेदक माऱ्यापुढे भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा डाव 203 धावांतच आटोपला. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला 30 च्या पुढे धावा करता आल्याने आफ्रिकेला विजयासाठी 204 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाप ड्यु प्लेसिस याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. आफ्रिकेच्या गोलंदाजानी त्याचा हा निर्णय योग्य ठरवत श्रीलंकेच्या संघास 50 षटकांत सर्वबाद 203 धावसंख्येवर रोखले. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करूणारत्ने हा पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कुसल परेरा 30, अविष्का फर्नांडो 30 आणि धनंजया डि सिल्वा 24 तर कुसल मेडिंसने 23 धावा काढत श्रीलंकेची धावसंख्या 200 पर्यंत नेली.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत क्रिस माॅरिसने 9.3 षटकांत 46 धावा देत 3 तर डी. प्रीटोरसने 10 षटकांत 25 धावा देत 3 गडी बाद केले. तर कगिसो रबाडाने 2 तर एन्डिले फेहलुकवेओ आणि जेपी डुमीनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.