नवी दिल्ली – एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. मात्र या बैठकीपासून विरोधी पक्षाचे नेते दूर जाताना पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपापासून लांब राहण्याच धोरण अंवलंबल आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत.
NCP chief Sharad Pawar will attend the meeting called by Prime Minister Narendra Modi in the Parliament today. The PM will chair a meeting of heads of various political parties in both the Houses of Parliament. (file pic) pic.twitter.com/a6vcMmB21X
— ANI (@ANI) June 19, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायचं की नाही यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहावं की नाही यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.