अनिल अंबानीच्या मागे चीनच्या बॅंकांचा तगादा

नवी दिल्ली – अनिल अंबानी आर्थिक अडचणीत आलेले असतानाच चीनच्या बॅंकांनी त्यांच्यामागे कर्ज परत फेडीसाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे.

चीनच्या विविध बॅंकांकडून अनिल अंबानी यांच्या कंपनीने जवळपास 15 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. 11 वर्षांपूर्वी अनिल अंबानी हे जगभरातील टॉप 10 अब्जोपतींच्या यादीत सामील होते, आता त्यांच्या कंपनीची पार वाट लागली असून ती कर्जाच्या गाळात पूर्णपणे बुडाली आहे.

चीनमधील चायना डेव्हलपमेंट बॅंक, एक्‍झिम बॅंक, यासारख्या बॅंकांनी अनिल अंबानी यांना भली मोठी कर्जे दिली होती. या कर्जाच्या रकमेचा एकत्रित आकडा हा 15 हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे आता 3,651 कोटींची संपत्ती उरली आहे. यामध्ये अंबानी यांनी गहाण ठेवलेल्या समभागांचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.