टॉंटन – सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकी आणि कर्णधार ऍरोन फिंच याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 308 धावांचे आव्हान ठेवले आहे.
What a comeback from the Pakistan bowlers! Amir finishes with a brilliant 5/30 to bowl Australia out for 307! #AUSvPAK SCORECARD 👇 https://t.co/RyjNER1Rlx pic.twitter.com/QWcng7caSH
— ICC (@ICC) June 12, 2019
तत्पूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियास फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 49 षटकांत सर्वबाद 307 धावापर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या आणि ऍरोन फिंच यांनी चांगली सुरुवात करत 22.1 षटकात पहिल्या विकेटसाठी 146 धावा जोडल्या. डेव्हिड वॉर्नरने 111 चेंडूत 107 धावा केल्या तर ऍरोन फिंच याने 84 चेंडूत 82 धावा केल्या.
It's game on at Taunton!
Australia looked set for a mammoth total thanks to David Warner's century, but Mohammad Amir's five-wicket haul sees the batting side bowled out for 307. #AUSvPAK LIVE 👇 https://t.co/eEmVwQQPYP pic.twitter.com/jN5CEq4YmY
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 12, 2019
पाकिस्तान संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद आमीर याने 10 षटकांत 30 धावा देत सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर शाहिन आफ्रिदीने 2 आणि हसन अली, वहाब रियाज, मोहम्मद हफीज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.