पुणे – पुण्यामध्ये आज बिबवेवाडी गावठाण परिसरात मनसैनिकांनी एक आगळंवेगळं आंदोलन केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पुण्यातील प्रभाग क्र.३६ मधील बिबवेवाडी गावठाण परिसरात गणेश स्वीट येथील रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे काम सुरु होते. सदर काम पूर्णत्वास आल्यानंतर खोदकाम केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले मात्र रस्त्याचे डांबरीकरण होऊन २४ तास देखील उलटले नसताना सदर रस्ता खचून एक मोठं भगदाड त्या ठिकाणी पडलं आहे.
सदर घटना लक्षात येताच मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याला पडलेल्या भगदाडामध्येच आंदोलन करण्यास सुरुवात केली. याबाबत बोलताना मनसे कार्यकर्त्यांनी, “चार महिन्यांपासून ड्रेनिज लाईनचे काम चालु होते, काल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले. सदर रस्त्यावर वरच्या-वर डांबर टाकण्यात आले असून निकृष्ठ कामामुळेच २४ तासांच्या आतच रस्ता खचला. ह्याला जबाबदार कोण? आज रस्त्याला भगदाड पडल्याने एक मोठी दुर्घंटना होता होता टळली.” अशी प्रतिक्रिया दिली.
सदर आंदोलनात विक्रांत अमराळे,संतोष चव्हाण,राहुल गवळी,गणेश नायकवाडे,मंगेश जाधव,विशाल शिंदे,राहुल दिघे,रितेश बढे, निलेश वेल्हाळ,अभिजित टेमभेकर, कुशल शिंदे,सनी खरात,महेश भोईभार,आशिष वाघमारे,सुरज बिबवे रुद्र अभंग,सागर खोमणे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. .