पिंपरी – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात शिख समाजाच्या वतीने शिखांचे पाचवे गुरू अर्जुनदेव यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून प्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरू अर्जुनदेव यांनी शिख समाजासाठी आपले प्राण अर्पण केले. या घटनेची आठवण ठेवत हा दिवस शिख धर्मीय शहीद दिन म्हणून पाळतात. यावेळी थंड पाणी, सरबत, चना-पुरी, पाव वाटण्यात आले. शेकडोंच्या संख्येने शिख बांधवांची उपस्थिती होती.
महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भगवे, लाल पगडी घातलेले शिख बांधव, अबाल वृद्ध लक्ष वेधून घेत होते. मंडपाला भगवे झेंडे लावण्यात आले होते. ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खाद्य वाटप करण्यात येत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सिग्नल जवळच या कार्यक्रमाचा मंडप टाकण्यात आला होता. चांगला पाऊस पडावा तसेच सामाजिक शांतता, सुख व समृद्धीसाठी यावेळी शिख बांधवांनी प्रार्थना केली.