चेन्नाई: केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाला सक्त विरोध करतानाच द्रमुकचे प्रमुख एम. के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारी कामकाजात तामिळी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की या मागणीसाठी आम्ही संसदेत लढा देऊ.
केंद्र सरकार त्रिभाषा धोरण अंमलात आणून तामिळनाडूत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही त्याला सक्त विरोध करीत आहोत. ही सक्ती तामिळनाडूत कदापिही लागू केली जाऊ शकत नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की द्रविडीयन चळवळीचे संस्थापक सी. एन अण्णादुराई यांनी द्विभाषा फॉर्म्युला त्यावेळी केंद्र सरकारला सुचवला होंता. या फॉर्म्युल्याच्या अंमलबजावणीचा आम्ही आग्रह धरू. तामिळनाडुत तामिळी आणि इंग्रजी या दोन भाषांचे धोरण 1968 पासून अंमलात आणले जात आहे. हेच धोरण अंतिम करावे अशी मागणीही स्टॅलिन यांनी केली.