कोपरगाव –कोपरगाव शहराभोवती वाढणारी उपनगरे आणि ग्रामीण लोकसंख्येचे भारमान विचारात घेऊन कोपरगाव बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी आ. स्नेहलता कोल्हे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा करून सुमारे 5 कोटी रुपये मंजूर केले. हे काम दर्जेदार व्हावे, यासाठी आ. कोल्हे यांनी अचानक या कामाची पाहणी केली. तसेच ठेकेदार नंदकिशोर सोनवणे यांना सूचना केल्या.
प्रारंभी आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी कामाची माहिती दिली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, गटनेते योगेश बागूल, कैलास जाधव, स्वप्नील निखाडे, डी. आर. काले, किरण बिडवे, मंगलताई आढाव, विद्या सोनवणे, बाळासाहेब आढाव, विवेक सोनवणे, जनार्दन कदम, सत्येन मुंदडा, विष्णुपंत गायकवाड, ज्ञानेश्वर अकोटकर, संजय होन, बाळासाहेब वक्ते, काका उदावंत, वीरपत्नी अहल्याबाई पगारे, फकीर महंमद पहिलवान उपस्थित होते.