एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धा
पुणे – ई2डी स्पोर्टस यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन इंटरप्राईज व हनिवेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत अमित कदमच्या अष्टपैलू कामगिराच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकात 8 बाद 109 धावा केल्या. यात अमित कदमने 29, विराज काकडेने 23तर ओमकार पाटीलने नाबाद 16 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमित कदम , सिध्देश वारघंटे व विराज काकडे यांच्या अचूक गोलंदाजीने बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड संघाला 19.5 षटकात सर्वबाद 106 धावांत रोखले. अमित कदम सामनावीर ठरला.
अन्य लढतीत प्रमोद बारवकरच्या नाबाद 43 धावांसह हनिवेल संघाने फोर्झा लॉजीस्टीक्स टेकलॅब संघाचा 6 गडी राखून तर रिग्रीन इंटरप्राईज संघाने ईक्यु टेक्नोलॅजी संघाचा 7 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.