पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून 31 उमेदवार रिंगणात असले तरी, खरी लढत भाजपचे गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी यांच्यात सुरु आहे. गिरीश बापट यांनी १५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
गिरीश बापट यांना एकूण 30682 तर मोहन जोशी यांना पारड्यात 14456 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना 6131 मते मिळली आहे.
सुरवातीपासून या मतदार संघात भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र बदलण्यात जोशी यांना काही प्रमाणात यश आले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे जरी सांगत असले तरी मोहन जोशी हे “डार्क हॉर्स’ ठरू शकतात.