रोम – अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने बोर्ना कोरिकचा केवळ दोन मॅच पॉईंट राखुन पराभव करत येथे होत असलेल्या इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपुर्व फेरीत आपला प्रवेश निश्चीत केला. यावेळी राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचने आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. मात्र, ऑस्ट्रेलियन निक किर्गिओसच्या धक्कादायक कृत्यामुळे त्याला अयोग्य ठरवले गेल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
यावेळी झालेल्या सामन्यात तिसऱ्या मानांकीत रॉजर फेडररने 13व्या मानांकीत बोर्ना कोरिकचा 2-6, 6-4, 7-6 (9-7) असा संघर्षपुर्ण पराभव केला. यावेळी सामन्याच्या सुरूवातीसच बोर्ना कोरिकने सामन्यावर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे पहिल्याच गेम पासुन कोरिकने फेडररला दबावात घेतले होते. यावेळी पहिला गेम सुरू असताना कोरिकने फेडररला मैदानाच्या चोहु बाजुने पळायला लावत पहिल्या सेट मध्ये 4-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे कोरिक पहिला सेट 6-0 असा जिंकेल असे वाटत असताना फेडररने सामन्यात पुनरागमन करत लागोपाठ दोन सेट आपल्या नावे केले. मात्र, कोरिकने पुन्हा फेडररला चकवत पहिला सेट 6-2 अशा फरकाने आपल्या नावे करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
दुसरा सेटही कोरिक जिंकेल असे वाटत असताना फेडररने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. यावेळी फेडररने बिनतोड सर्व्हिसेस करत कोरिकवर दबाव वाढवल्याने कोरिकच्या हातुन चुका होताना दिसल्या. मात्र, कोरिकने वेळेवेळी पुनरागमनाचा प्रयत्न करत एक दोन गेम जिंकत फेडररचे टेन्शन वाढवले होते. मात्र, फेडररने दुसरा सेट 6-4 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली होती.
तिसऱ्या सेट मध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करत सामन्यात उत्कंठा वाढवली होती. यावेळी तिसऱ्या सेट मध्ये दोघांनीही 6-6 अशी बरोबरी साधल्याने मॅच पॉईंटवर सामन्याचा निर्णय ठरणार होता. यावेळी अखेरच्या सेट मध्ये कोरिकने आधी आघाडी घेतली होती. मात्र, त्याचे लागोपाठ दोन परतीचे फटके नेटला लागल्याने फेडररने सामन्यात पुनरागमन करत अखेरचा सेट 9-7 अशा फरकाने जिंकत उपान्त्यपुर्व फेरीत प्रवेश केला. आता त्याचा पुढील सामना स्टेफॅनोस त्सित्सिपासशी होणार आसुन त्सित्सिपासने फाबिओ फॉगनिनीचा 6-4, 6-3 असा सहज पराभव करत उपान्त्यपुर्व फेरी गाठली आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना फेडररने बोर्ना कोरिकची स्तुती करताना सांगितले की, आजच्या सामन्यात माझे नशीब चांगले होते म्हणुन मी विजयी ठरलो अथवा आज मला कोरिकने पराभुत केले असते. सामन्यातील दुसरा आणि तिसरा सेट माझ्या साठी महत्वाचा होता ज्यात मी चांगला खेल करत पुनरागमन केले. तर, अन्य सामन्यात राफेल नदालने निकोलस बासिलाश्विलीचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत आगेकूच केली.
नदालने सामन्याच्या पहिल्या सेट पासुनच वर्चस्व गाजवत निकोलसवर दबाव वाढवला. त्यामुळे निकोलसला सामन्यात पुनरागमनाक्ष्ची कोणतीही संधी मिळाली नाही. निकोलसने यावेळी पहिल्या सेट मध्ये केवळ एक गेम जिंकला मात्र, दुसऱ्या सेट मध्ये त्याला एकही सेट जिंकता आला नाही. नदालचा पुढील सामना आता फर्नार्डो वेर्डास्कोशी होणार आहे.
तर, नोव्हाक जोकोविचने जर्मनीच्या फिलिप कोहेलशेरीबरचा 6-3, 6-0 असा एकतर्फी पराभव करत उपान्त्यपुर्व फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना जुआन मार्टिन डेल पोट्रोशी होणार आहे. यावेळी झालेल्या सामन्यात जोकोविचने फिलिपवर एकतर्फी वर्चस्व गाजवल्याने फिलिपला सामन्यात पुनरागमन करणे अवघड गेले.
मात्र, पहिल्या सेट मध्ये त्याने तीन गेम जिंकत सामन्यात थोडीफार सनसनाटी निर्माण केली होती. मात्र, त्याला दुसऱ्या सेटमध्ये एकही गेम जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियन अव्वल टेनिसपटू निक किर्गिओसने सामन्यात पिछाडीवर पडल्याने राग व्यक्त करत मैदानावर खुर्ची फेकल्याने त्याला सामन्यात अयोग्य ठरवत त्याला सामना सोडण्यास सांगीतल्याने कॅस्पर रडला पुढे चाल मिळाली.