नवी दिल्ली: सोशल मीडियामुळे आता प्रत्येक नागरिक जागृत झाला आहे. कोणी लोकप्रतिनिधी चुकीचा बोलला तर त्याला लगेच ट्रोल केल्या जाते. यावेळेस चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलल्यामुळे ट्रोल झाले आहेत. मोदींनी एअर स्ट्राईकबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले होते. आता पुन्हा त्यांना डिजिटल कॅमेराबाबत केलेल्या वक्तव्यावरून ट्रोल करण्यात आलं आहे.
नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९८७-८८ साली कॅमेरा वापरल्याचा दावा केला. तसेच तेव्हा मोजक्याच व्यक्तींकडे इमेल-आयडी असल्याचे मोदी सांगतात. तेव्हा विरामगाममध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेत मी त्यांचा फोटो काढला. त्यानंतर दिल्लीला तो ट्रान्स्मिट केला. दुसऱ्या दिवशी आपला फोटो पाहून अडवाणी अवाक झाल्याचे मोदी सांगतात.
भारतात डिजिटल कॅमेरा १९८८ साली फुजी DS-1P हा उपलब्ध झाला. मात्र त्याची विक्री झाली नाही. लॉजिटेक फोटोमनचा डिजिटल कॅमेरा १९९० साली पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यामुळे १९८८ नेमका कोणता डिजिटल कॅमेरा वापरला ? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.
15 ऑगस्ट 1995 साली विदेश संचार निगम लिमीटेड (VSNL) या सरकारी कंपनीनं सार्वजनिक इंटरनेट सुरू केले आहे. दिवंगत राजीव गांधी हे आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी देशात टेलेकम्युनिकेशनच्या क्रांतीची सुरुवात केली होती.