हरियाणा – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हरियाणा येथील सीसरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांद्वारे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीकेचे सत्र सुरु आहे. पंतप्रधानांनी दिवंगत राजीव गांधी यांना ‘भ्रष्टाचारी नंबर १’ असं संबोधल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी देखील त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांच्या राजीव गांधी यांच्यावरील टीकेस प्रतिउत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “तुम्हाला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि माझ्यावर टीका करायची असल्यास खुशाल टीका करा. मात्र त्यापूर्वी तुम्ही जनतेला समजवा की तुम्ही राफेल करारामध्ये काय केलं? तरुणांना २ कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं काय झालं? याचं उत्तर तुम्ही जनतेला द्या.”
तत्पूर्वी दिल्लीमध्ये काल एका रोड शोला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनीदेखील पंतप्रधानांवर निशाणा साधताना, ” निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नोटाबंदीवर लढा, जीएसटीवर लढा, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासने दिलीत त्यावर लढा, जी फसवणूक केलीत त्यावर लढून दाखवा.”असं खुलं आव्हान दिलं होतं.
#WATCH: Rahul Gandhi says in Haryana's Sirsa "Agar aapko Rajiv Gandhi ji aur meri baat karni hai aap zaroor kijiye, dil khol ke kijiye. Magar janta ko samjha dijiye ki aapne Rafale maamle mein kya kiya kya nahi kiy…jo vaada kiya tha 2 cr yuvaon ko rozgar ka wo poora nahi kiya" pic.twitter.com/Ui1dSrqvYs
— ANI (@ANI) May 9, 2019