नवी दिल्ली – दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दिल्लीतील सातही मतदारसंघांमध्ये निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार असल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. निवडणुकांपूर्वी भाजपला सत्तेतून दूर ठेवणे या समान अजेंड्यावर एकमत होऊन काँग्रेस-आप आघाडी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र तसं न झाल्याने यंदा दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
याच पार्श्ववभूमीवर आता दिल्ली काबीज करण्यासाठी स्वतः पंतप्रधान प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. रामलीला मैदानावरून दिल्लीकरांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आज विरोधकांवर चौफेर टीका केली. आम आदमी पक्षावर निशाणा साधताना ते म्हणाले, “या देशाने चार प्रकारच्या राजकीय संस्कृती पहिल्या. त्या चार राजकीय संस्कृती म्हणजे नामपंथी, वामपंथी, दाम आणि दामनपंथी, विकासपंथी. मात्र दिल्लीकरांनी एक आणखीन राजकीय संस्कृती अनुभवली असून ती म्हणजे ‘नाकामपंथी’.”
PM Narendra Modi in Delhi: There is something for which I also apologise to you. After becoming PM, the security moves along with me. I see barricading and that people are stopped from going ahead. Some people would be late to reach their houses due to me, today too. https://t.co/DSNVqHphvm
— ANI (@ANI) May 8, 2019