उद्या घेण्यात पुण्यात घेणार भेट
पुणे : कॉंग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी उद्या ( रविवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्यचा निर्णय घेतला असला तरी, पक्षाकडून भाजपाला पाय उतार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुण्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असून मनसेचा पाठींबा मिळविण्यासाठी हे भेट असणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मनसेकडून अद्याप कोणत्याही पक्षाला जाहीर पाठींबा दिलेला नसला तरी, मनसे अध्यक्ष येत्या 18 एप्रीलला पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत.या सभेतही त्यांचा निशाना भाजपवर असणार आहे. त्यामुळे ही सभा पुणे लोकसभा मतदार संघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सिमेवर होत असल्याने त्याचा फायदा निश्चितच भाजप विरोधी उमेदवारांना होणार आहे.
त्यामुळे पुण्यात कॉंग्रेसाठीही ही सभा महत्वाची ठरणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी रात्री केसरीवाडयातील लोकमान्य टिळक सभागृहात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा पार पडली यात मनसेकडून या सभेत कशा प्रकारे इतर पक्षांचे सहकार्य हवे याबाबत माहिती देण्यात आली तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मनसेने मतदान तसेच मतदानाच्या दिवशी कशा प्रकारे सहकार्य करावे याबाबत माहिती दिली. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती.