लोकसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवायचा – उद्धव ठाकरे

निषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत का पाकिस्तान मध्ये घुसून कंबरडं मोडणारे

हिंगोली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील जी यांच्या प्रचारार्थ हदगाव येथे जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “जर जवाहरलाल नेहरूंनी सावरकरांसारखा सश्रम कारावास भोगला असेल तर मी नेहरूंना वीर जवाहरलाल नेहरू म्हणायला तयार आहे.” तसेच काँग्रेस सरकारवर टीका करताना ते म्हणाले, जर उरी, पुलवामा सारखे हल्ले झाल्यावर नुसते निषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत का पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानचे कंबरडं मोडणारे पंतप्रधान पाहिजेत?

चारा टंचाई बाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे संपूर्ण मराठवाड्यात जिथे जिथे चारा छावण्यांची गरज आहे ते लवकरात लवकर सुरू करा. आचारसंहिता चारा छावण्यांचा आड येता कामा नये, असेही ठाकरे म्हणाले.

शिवरायांचा महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा दाखवत आला आहे. आता महाराष्ट्राने ठरवलं आहे लोकसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवायचा. राज्यात एक ही जागा नाही जिथे महायुती कमकुवत आहे, हिंगोलीची जागा तर आपण आजच जिंकलो आहे, असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.