आंध्रप्रदेश : 17 वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि 2 केंदशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पहिल्याच टप्प्यातील मतदानाला टीडीपी-वाएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे गालबोट लागले असून ही घटना आंध्रप्रदेशातील गुरजाला मतदारसंघातील श्रीनिवासपूरम गावातील मतदान केंद्रावर घडली आहे.
या हाणामारीच्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH Andhra Pradesh: A clash broke out between workers of TDP and YSRCP at a polling station in Srinivasapuram Village of Gurajala assembly constituency in Guntur district. #IndiaElections2019 #AndhraPradeshElections2019 pic.twitter.com/lF0edCFuFf
— ANI (@ANI) April 11, 2019