पुण्यात अभाविपचे मतदार जनजागृती अभियान !

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने २५ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या काळात ‘Nation First, Voting Must’ हे अभियान चालवण्यात येत आहे. मतदानाबाबत जनजागृती करून नागरिकांना मतदानामध्ये आपला हक्क बजावण्यासाठी अभाविपने आपली सामाजिक भूमिका व जबाबदारी लक्षात घेता या अभियानाचे आयोजन केले आहे.

मतदानाबाबत जनजागृती करताना अभाविपने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नव मतदारांवर विशेष लक्ष देत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे.

”‘Nation First, Voting Must’ अभियानात १००% मतदानाबाबत पुण्यात व संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात आली असून अभाविपने यावेळी प्रत्यक्ष समाजमाध्यमांच्या वापरासह ७ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे. अभाविप या अभियानाद्वारे, आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता एक महत्त्वाची भुमिका यशस्वीपणे पार पाडत असुन उद्यापासुन सुरू होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी त्यांनी मतदारांना आवाहन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.