नेवासा, (प्रतिनिधी)- नेवासा – श्रीरामपूर राज्यमार्गावरील कारवाडी शिवारात असलेल्या हॉटेलओम साईचे मालक बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०, रा.पाचेगाव, ता.नेवासा) यांचा मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी डोक्यात टणक हत्यार मारून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
या घटनेची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि. धनंजय जाधव यांना समजताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हजर झालेले असून घटनास्थळाचे ठसे घेतले.
अज्ञात आरोपींचा शोध करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहे. घटनास्थळी नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.जाधव व गुन्हे शाखेचे पोलीस हजर असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर तपास करत आहे.