कोपरगाव, (प्रतिनिधी): तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जमनराव भारुड व कौशल्याबाई भारुड यांना नुकताच सामाजिक न्याय विभागाचा सन 2019 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला
भारुड यांनी जवळपास बार ते तेरा वर्षे जि.प. सदस्य असताना अनेक योजना गोरगरिबापर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनविण्यासाठी परिश्रम घेतले. सामाजिक न्यायहक्कासाठी लढे देऊन अनेकांना न्याय मिळवून दिलेला असून ते प्रा .जोगेंद्र कवाडे यांचे निकटवर्तीय आहे .
कोपरगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी प्रा.कवाडे, शिवाजीराव ढवळे व सकल आंबेडकरी समाज बरोबर घेऊन अनेक समाज हितासाठी आंदोलने केली. मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाटपाण्यासाठी नेहमी संघर्ष करत असतात. सर्वच समाजासाठी त्यांचे मोठे योगदान असून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.