Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final : रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर गारद झाला.
टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेले अंजिक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर पुन्हा फ्लॉप ठरले. हे दोघेही तामिळनाडूविरुद्धच्या रणजी उपांत्य फेरीत फ्लॉप ठरले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा फलंदाजीतून चमत्कार दाखवत 69 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली.
रहाणे आणि श्रेयस यांना मुंबईच्या पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही.मुबंईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर संघासाठी विशेष काही करू शकले नाहीत. रहाणे आणि अय्यर पहिल्या डावात प्रत्येकी 7-7 धावा करून बाद झाले.
श्रेयस पुन्हा फ्लॉप…
श्रेयस अय्यर गेल्या काही सामन्यांमध्ये सतत फ्लॉप ठरला आहे. या सामन्यातही तो विशेष काही करू शकला नाही. अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्याने 15 चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला आणि 7 धावा केल्या. अय्यरला उमेश यादवने बाद केले. याआधी अय्यर तामिळनाडूविरुद्ध अवघ्या 3 धावा करून बाद झाला होता. त्याने भारताकडून इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दोन कसोटी सामनेही खेळले. यादरम्यान तो विशाखापट्टणममध्ये 27 आणि 29 धावा करून बाद झाला. हैदराबादच्या कसोटीत 35 धावा आणि 13 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांनंतर श्रेयसला संघातून वगळण्यात आले होते.
कर्णधार रहाणे अवघ्या 7 धावा करून बाद…
अजिंक्य रहाणेसाठीही मागील काही सामने सोपे राहिले नाहीत. अंतिम फेरीत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान तो 35 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. हर्ष दुबेने रहाणेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याआधी रहाणे तामिळनाडूविरुद्ध 19 धावा करून बाद झाला होता. बडोद्याविरुद्धच्या एका डावात शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात तो 3 धावा करून बाद झाला. आसामविरुद्ध रहाणेला केवळ 22 धावा करता आल्या. त्याने छत्तीसगडविरुद्ध एका डावात एकमात्र अर्धशतक झळकावले8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने .