Sara ali khan – अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती मंदिरांना भेट दिल्यावरून ट्रोल होत असते. अशात पुन्हा एकदा सारा मंदिराला भेट दिल्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच सारा अली खान भोलेबाबाच्या दरबारात पोहोचली यावेळी तिने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले.
येथे तिने महादेवाचे दर्शन घेतले. यावेलीचे फोटो सोशल मीडियावर साराने शेअर केले आहे. तिच्या या फोटोने चाहत्यांचे मने जिंकली आहे. तर अनेक सोशल मीडिया युजर्सने तिला संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे, सारा अली खानने महाराष्ट्रातील औरंगाबादपासून 20 किमी अंतरावर वेरूळ गावात बांधलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भोलेनाथाचे दर्शन घेतले. बाबा भोलेनाथच्या दर्शनाचे फोटो शेअर करताना साराने लिहिले, ‘जय भोलेनाथ.’
View this post on Instagram
साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. य फोटोवर एका युजर्सने लिहिले आहे सारा तुझ्या नावातील अली काढून टाकावे असं लिहीत एका युजर्सने तिला खोचक सल्ला दिला. एका यूजरने लिहिले की, ‘साराचे महत्त्व बॉलिवूडमध्ये क्वचितच पाहायला मिळते.’ यासोबतच अभिनेत्रीच्या पोस्टवर कुणी ‘जय श्री राम’ तर कुणी ‘हर हर महादेव’ अशी कमेंट केली.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट विकी कौशलसोबत २०२३ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पसंती मिळाली होती. सारा लवकरच ‘स्काय फोर्स’मध्ये दिसणारा असल्याची चर्चा आहे.