पारनेर – पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये बारगळ वस्तीवरील अंतर्गत ४.५ लाख किंमतीची गटार लाईन, १ लाख २० हजार रकमेचे जिल्हा परिषद शाळेची राळा घोटाई , ५० हजार रुपयांचे अंगणवाडी समोरील पेव्हिंग ब्लॉक या कामाचा समावेश आहे.
आर्थिक वर्षातील १० लाख किमतीची कामे प्रगतीपथावर असून त्याचेही लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती सरपंच जनाबाई तरटे यांनी दिली. यावेळी उपसरपंच अमोल जाधव, मा. उपसरपंच संजय नवल, संगीता शेलार, सरिता जगताप, रमेश पाचरणे,दत्ता गाडीलकर, बायजाबाई इरकर, कविता गाडीलकर आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेविका अवधूत, बाबाजी गाडीलकर, रावसाहेब बारगळ, रमेश शेळके, रोहिदास नवले, वसंतराव देशमुख, संजय तरटे, सेवा सोसायटीचे चेअरमन अंबादास तरटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.