चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी राज्य सरकारच्या जनकल्याणाच्या धोरणांबाबत माहिती दिली आहे. तामिळनाडू सरकारने द्रविड आणि जनजाती कल्याण विभागाच्या अंतर्गत १७१ कोटी रूपयांच्या योजना तयार केल्या आहेत. या योजनांच्या उदघाटनासोबतच त्यांनी १८४ कोटी रूपयांची मदतही प्रदान केली.
तामिळनाडू सरकारने सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाच्या उत्कृष्ट सिध्दांतावर कार्यरत आहे. राज्याच्या विकासासाठी सरकार नवे परिमाण स्थापन करते आहे आणि विकासासाठी सरकारचे कठोर परिश्रम सुरू असल्याचे स्टॅलीन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की सगळ्यांसाठी सर्वकाही हे आपल्या सरकारचे धोरण आहे. त्या अंतर्गत १७५ कोटी रूपये खर्च करून १२ द्रविड विद्यार्थी वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत. द्रविड आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आमचा विशेष भर आहे. विकासासाठी राज्य सरकारकडून सर्व सवलती दिल्या जात आहेत.
दरम्यान, स्टॅलीन यांनी या कार्यक्रमात तामिळनाडूत काम करणारे स्वच्छता कर्मचारी आणि इरूलर जमातीच्या लोकांसाठी तयार केलेल्या ९४३ घरांच्या चाव्या लाभार्थींना सूपूर्द करण्यात आल्या. त्यांनी राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत ७७६ लाभार्थींना ६२ कोटींची अनुदानाची रक्कमही प्रदान केली. तर काही लाभार्थींना यावेळी नियुक्तीचे आदेश देण्यात आले.