पुणे – कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरी अखेर प्रथमेश शेरला, संदेश बजाज, अर्पित गजभिजे, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात ५ गुणांसह आघाडी प्राप्त केली.
मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनरेटेड गटात संदेश बजाजने अविनाश नेमाचा, तर, अर्पित गजभिजेने शिवम सिंगचा पराभव करून ५ गुण मिळवले. रेटेड गटात प्रथमेश शेरलाने अक्षय जोगळेकरचा पराभव करून ५ गुणांची कमाई केली. ८ वर्षाखालील गटात अर्जुन कौलगुडने शौर्य सोनावणेवर विजय मिळवत ५ गुण मिळवले.
Sports In Pune : मिलेनियम-कुंटे बुद्धिबळ स्पर्धेस आजपासून प्रारंभ….
स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, इंटरनॅशनल आरबीटर विवेक सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.