पुणे – कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण २१५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
हि स्पर्धा मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे रविवार, २४ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. तसेच हि स्पर्धा चार गटात होणार असून यामध्ये गौरव बकलीवाल(२१४४), आर्यन करमलकर(१५२२), सुनील वैद्य(१४५४), शौर्य घेलानी(११६१), निवान अगरवाल(१०७८), विहान देशमुख(१२२३), सम्यक कुलकर्णी(११९०) यांचा समावेश आहे.
हि स्पर्धा अ गटात (रेटेड गट), ब गटात (अनरेटेड गट), क गटात(८ वर्षाखालील) आणि ड गटात( १० वर्षाखालील गट)अशी पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण ३२,०००/-रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.