बारामती – सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, क्रीडा जागृती आयोजित आणि इंडीयन ऑईल सरहप्रायोजित ४थ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आज दुस-या व अतिंम दिवशी चिन्मय केवलरमानी, सुर्या थात्तु, प्रणिता सोमण, विरेंद्रसिंह पाटील, श्रावणी परीट, स्नेहल माळी यांनी आपापल्या गटात पदके पटाकवताना स्पर्धेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.
बारामती येथे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आज मास स्टर्ट प्रकारतील स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
Tennikoit Championship : राज्य टेनिक्वाईट स्पर्धेसाठी पुणे संघ जाहीर…
याप्रसंगी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय साठे, स्पर्धेचे मुख्य पंच सुदाम रोकडे, स्पर्धासंचालिका दिपाली पाटील, प्रा. साईनाथ थोरात, कॅमचे खजिनदार भिकन अंबे, बारामतीचे सायकल व्यावसीक संजय दराडे आदी मान्यवर हजर होते.