रिओ दी जानेरो :– फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीच्या लढतीत अर्जेन्टिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. मात्र, हा सामना खेळापेक्षा दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेमुळेच जास्त गाजला. या सामन्यात ब्राझीलच्या समर्थकांनी अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला उद्देशून काही टोमणे मारले तसेच मेस्सीची खिल्लीही उडवली. त्यामुळे मेस्सीच्या चाहत्यांनी ब्राझील समर्थकांवर हल्लाबोल केला.
सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले. त्यानंतर खेळाडू मैदानातच सामना सुरु होण्याची वाट पाहात होते. त्यावेळी प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी मेस्सीची खिल्ली उडवली. त्याला उद्देशून काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यामुळे अर्जेन्टिनाचेही चाहते भडकले व त्यांच्यात थेट मारामारीच सुरु झाली. मारहाणीत काही चाहत्यांचे डोकेसुध्दा फुटल्याचे समोर आले आहे.
व्हिडीओ येथे 👇👇👇👇👇👇 पहा…
After their fans were beaten with riot sticks by the Brazilian police in the stadium, Argentina 🇦🇷 hands Brazil 🇧🇷 their first EVER loss in a @FIFAWorldCup qualifying match at home.
Wild scenes out of Rio as the world champs defeat their hated rival 1-0.pic.twitter.com/QpmIJ7ENJ2
— chri$tian (@mortxnsen) November 22, 2023
यावेळी दोन्ही संघ मैदानातून डगआऊटमध्ये गेले व पोलीसांनी लाठीचार्ज करत या प्रसंगावर नियंत्रण मिळवले. मात्र, या सगळ्या गोंधळात सामना 27 मिनिटे उशीरा सुरु करावा लागला. या घटनेमध्ये अनेक चाहते जखमी झाले असून काहींनी जवळच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.
व्हिडीओ येथे 👇👇👇👇👇👇 पहा…
Brazilian police giving a baton to a Brazilian fan so he could attack Argentinians.
This is crazy. Disgrace. pic.twitter.com/01ppZmVdqt
— All About Argentina 🛎🇦🇷 (@AlbicelesteTalk) November 22, 2023
दरम्यान, दक्षिण अमेरिका खंडातील या दोन देशांतील हा सामना विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता सामना होता. अर्जेन्टिना या पात्रता फेरीत 12 गुणांसह अव्वलस्थानी आहे.